Type Here to Get Search Results !

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी PDF 2024 | 6 December Speech in marathi PDF| Mahaparinirvan din bhashan marathi PDF 2024 2025

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी PDF 2024 | 6 December Speech in marathi PDF| Mahaparinirvan din bhashan marathi PDF 2024 2025


नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बंधन ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण या लेखांमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण तसेच महापरिनिर्वाण दिनाचे सूत्रसंचालन महापरिनिर्वाण दिनाचे फलक लेखन महापरिनिर्वाण दिनाचे चारोळी सुविचार इतर माहिती आपण आज या लेखांमध्ये सविस्तर बघणार आहोत ही सर्व माहिती आपण पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता याचा फायदा नक्कीच विद्यार्थी शिक्षक यांना होणार आहे त्यामुळे सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा चला तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चे भाषण सूत्रसंचालन व चारोळी फलक लेखन याला सुरुवात करूय.

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी PDF 2024 | 6 December Speech in marathi




🎯 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण 
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त सूत्रसंचालन
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलक लेखन 
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त चारोळी सुविचार
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभार प्रदर्शन



✅ 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी PDF 2024 | 6 December Speech in marathi PDF| Mahaparinirvan din bhashan marathi PDF 2024 2025


होता सिंहा सारखा आमचा बाबा

नव्हती त्याला कोणाची भीती

होऊन गेले वर्ष जरीही किती

आजही बोलावते आम्हाला.

ती चैत्य भूमीची माती.....


 आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजीं वर्ग आणि उपस्थित माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो.

आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहोत.

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला.

लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर

महामानव क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर 1956 दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.

सहा डिसेंबर हा दिवस जगामध्ये सर्वत्र महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.

6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात. 

व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिंना नमन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी 14 ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो अनुयायासोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते. ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते. ते बौद्ध धर्मगुरू होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथी साठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते धन्यवाद. शेवटी जाता जाता म्हणेन 

शिल्पकार तुम्ही घटनेचे

पंडित तुम्ही कायद्याचे

प्रचारक तुम्ही समतेचे

भारतरत्न तुम्ही देशाचे




🎯 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण 
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त सूत्रसंचालन
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलक लेखन 
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त चारोळी सुविचार
🎯 महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभार प्रदर्शन 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !